SaraswatiAI
Empowering Education for All with AI
अशी होती रे माझी आई

पूर्वी शाळेत इतिहासात शिकलो होतो की शिवाजी महाराज म्हणाले होते अशीच आमची आई असती सुंदर रूपवती…… आम्हाला हे म्हणावच लागल नाही अशीच माझी आई होती गोरी गोरी पान आणि सुंदर !!आईच सौंदर्य देवघरातल्या समईसारखं होत सोज्वळ आणि शांत. 

तिच्या चारही मुलांवर तिचं निरातिशय प्रेम होतं. आम्हाला शिस्त लावायची मोठी जबाबदारी वडिलांनी घेतली होती त्यामुळे तिला आम्हाला रागवायची वेळ खूप कमी आली . मुळात आई खूप बडबडी न्हवती तिला बोलत करावं लागायच . ती अत्यंत सोशिक होती आणि मनानी खंबीर पण .एकदा लहान असताना आम्ही समुद्रावर जात होतो समोरून म्हैस आली आम्ही सगळ्यांनी घाबरून बाजूच्या शेतात उड्या मारल्या आईने शांतपणे तिची शिंग वळवली आणि बाजूनी आली आम्ही आ वासून बघत होतो!

साधारण मध्यम वर्गात थोड्या अडचणीच्या परिस्थितीत तिचा जन्म झाला घरात भावंड भरपूर आई सगळ्यात मोठी म्हणून त्या काळी साधारण १९५० साली ती मालवणला मॅट्रिक झाली आणि दुसऱ्या शहरी राहून तिने teacher training चा कोर्स केला . तिला नोकरी मुंबईला लागली त्याही काळी मुंबईला राहणार कुठे हा मोठा प्रश्न होता दादरला पोर्तुगीज चर्च सारख्या ठिकाणी खोली मिळत होती पण काही अडचणी होत्या . पण त्यामुळे घाबरून गावी परत न जाता ती त्यावेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना भेटली त्यांनी तिला यशवंत रावाना भेटायला सांगितले म्हणून ती त्याना भेटली असता त्यांनी खोली देण्यात असमर्थता दाखवली . तिनी त्याना चक्क सांगितल मला घर नाही तुम्ही देत नाही मी मंत्रालयासमोर बसून राहणार ते म्हणाले ताई नको ग अस काही करू मी देतो तुम्हाला दादरची खोली ! आई इतकी हिम्मतवान होती हे तिला पाहून कधीच वाटायचं नाही पुढे मामा मावश्या तिची ही गोष्ट रंगवून सांगायचे तेंव्हा केवढा अभिमान वाटायचा. 

नंतर तिनी आमच्या संगोपनासाठी नोकरी सोडली पण कधी म्हणून याविषयी चकार शब्द काढला नाही. खूप प्रेमाने ती आमच वडलांच करत राहिली ती सुंदर असली तरी आमची जिजाऊच होती. बऱ्याचदा माणूस गेल्यावर त्याच मोठेपण जास्त जाणवत तस आज माझ झालाय आज तिच्या स्मृतिदिनी “आई तुला त्रिवार वंदन “ 🙏🙏🙏

गीता चौकुळकर – कृतज्ञ मुलगी